टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना गयानाातील प्रोव्हिडन्स मैदानात होणार आहे. पण या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या सामन्यात वारंवार खंड पडू शकतो. इतकंच काय तर सामना रद्द करण्याची वेळ देखील येऊ शकते. अशा स्थितीत आयसीसीने एक बाब निश्चित केली आहे. ती म्हणजे रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी षटकं कमी केली जातील. तिथपर्यंत 20 षटकांचा खेळ पूर्ण होईल असंच यातून स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नसून अतिरिक्त 4 तास 10 मिनिटांचा अवधी दिला आहे. म्हणजेच हा सामना रात्री 8 वाजता सुरु झाला तर वेळेनुसार तीन तासात संपला पाहीजे. म्हणजेच रात्री 3 वाजेपर्यंत हा सामना खेळवला जाईल. पावसाचा खंड पडला तर मग उर्वरित वेळ पाहून रात्री 12.10 मिनिटापासून षटकं कमी केली जातील. जितका अवधी शिल्लक असेल तिथपर्यंत काही षटकं कमी केली जातील. त्यात डकवर्थ लुईस हा नियम दोन्ही संघ दहा षटकं खेळल्यानंतर लागू होईल.
प्रोव्हिडन्स स्टेडियमची खेळपट्टी ही सर्वात मोठं गूढ आहे. पॉवर प्लेमध्ये रनरेट 6.4 असतो, मधल्या षटकात 5.5 पर्यंत घसरतो आणि डेथ ओव्हरमद्ये 7.6 पर्यंत पोहोचतो. या मैदानावर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले होते. न्यूझीलंडला 84 धावांनी पराभूत केलं होतं. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ फक्त 75 धावा करू शकला होता. 2022 वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या कटू आठवणी भारतासोबत आहे. या सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं होतं.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज , यशस्वी जयस्वाल.
इंग्लंड संघ: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले.