आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात गत विजेता इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे गयाना प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला पावसामुळे विलंबाने टॉस झाला. इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने टॉस जिंकला. बटलरने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं आहे. आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो, असं रोहितने टॉस वेळेस सांगितलं. त्यामुळे रोहितला टॉस न जिंकता हवं ते मिळालं. जॉस बटलर आणि रोहित शर्मा या दोघांनी प्लेइंग इलेव्हनबाबत एक सारखीच भूमिका घेतली आहे. इंग्लंड आणि टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या उपांत्य फेरीतील सामन्यासाठी कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही कर्णधारांनी आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांच्यासह खेळण्याचा निर्णय केला आहे.
दरम्यान टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात या स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएचा पराभव केला. तर कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. तर सुपर 8 मध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसर्या बाजूला इंग्लंडचा साखळी फेरीतील पहिल्या सामन्याचा निकाल लागला नाही. दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. तर त्यानंतर उर्वरित 2 सामने जिंकले. तर तर सुपर 8 मध्ये 2 सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
दोन्ही संघ अनचेंज
Play will start at 9:15 PM IST! ⌛
The Playing XIs are out for this highly anticipated clash! 🔥#TeamIndia seek vengeance for their 2022 semi-final defeat as they face off against the defending champions, England! 💯
Which team will make their way to the #T20WorldCup 2024… pic.twitter.com/Gzp1bePzBt
— Star Sports (@StarSportsIndia) June 27, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.