IND vs ENG Test : इंग्लंड पराभवाच्या वेशीवर, पहिल्या डावात भारताकडे 259 धावांची आघाडी

| Updated on: Mar 09, 2024 | 10:23 AM

पाचव्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. पहिला डावात भारताने 259 धावांची मजबूत आघाडी घेतली. त्यामुळे ही आघाडी मोडून भारतासमोर विजयी आव्हान देणं खूपच कठीण आहे. त्यामुळे विजय भारताच्या पारड्यात पडला आहे.

IND vs ENG Test : इंग्लंड पराभवाच्या वेशीवर, पहिल्या डावात भारताकडे 259 धावांची आघाडी
Follow us on

मुंबई : पाचव्या कसोटी सामन्यातील विजय भारताच्या पारड्यात झुकला आहे. पहिल्या डावात इंग्लंडने सर्व गडी बाद 218 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताने मजबूत आघाडी घेतली. 218 धावांचा टप्पा ओलांडून भारताने 259 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे ही आघाडी मोडून काढण्याचं इंग्लंडसमोर मोठं आव्हान असणार आहे. रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांची फिरकी मोडून काढणं कठीण आहे. पहिल्या डावात कुलदीप यादवने 5, आर अश्विनने 4 आणि रवींद्र जडेजाने 1 गडी बाद केला होता. त्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण 218 धावांवर आटोपला होता. दुसरीकडे, भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 50 पेक्षा अधिक धावा केल्याने इंग्लंड पुरता बॅकफूटवर गेला आहे. आता इंग्लंडसमोर कसोटी वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. पण हे आव्हान गाठणं क्रिकेट गणितात तरी शक्य नाही असंच दिसत आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूची चमत्कारिक इनिंगचं सामन्याचं रुपडं पालटू शकते.

दरम्यान इंग्लंडची सुरुवात एकदम निराशाजनक झाली आहे. बेन डकेटच्या रुपाने इंग्लंडला पहिला धक्का बसला आहे. आर अश्विनने बेन डकेटला दोन या धावसंख्येवर त्रिफळाचीत केलं आहे. तसेच विजयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दितील 100 वी कसोटी आहे. त्यामुळे त्याच्याकडून क्रीडारसिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताकडे 255 धावांची आघाडी होती. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह ही जोडी मैदानात होती. या जोडीने चार धावा धावसंख्येत जोडल्या आणि कुलदीप यादवला अँडरसनने तंबूचा रस्ता दाखवला. 30 धावा करून कुलदीप यादव माघारी परतला. त्यानंतर शोएब बशीरने जसप्रीत बुमराहला बाद केलं. त्याने 20 धावा केल्या होत्या.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन