IND vs ENG : केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या नावामागे स्टारमार्क, संघ निवडताना बीसीसीआयने ठेवला असा निष्कर्ष

| Updated on: Feb 10, 2024 | 12:33 PM

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील दोन सामने झाले असून 1-1 ने बरोबरी झाली आहे. त्यामुळे पुढील तीन सामने निर्णायक ठरणार आहेत. त्यात भारताने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. पण रवींद्र जडेजा आणि केएल राहुलसाठी एक निष्कर्ष ठेवला आहे.

IND vs ENG : केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या नावामागे स्टारमार्क, संघ निवडताना बीसीसीआयने ठेवला असा निष्कर्ष
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारत इंग्लंड कसोटी सामना महत्त्वाचा आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवायचं असेल तर विजयी टक्केवारी राखणं महत्त्वाचं आहे. असं असताना उर्वरित तीन कसोटी सामन्यात चांगली कामगिरी विजय मिळवण्याची नामी संधी टीम इंडियासमोर आहे. पण टीम इंडियाची संघ निवडीत अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली आहे. कोणाला संघात घ्यायचं आणि कोणाला आराम द्यायचा अशा मनस्थितीत निवड समिती होती. पण अखेर चालढकल करत टीम इंडियाची निवड केली आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश केला आहे. पण त्यासाठी बीसीसीआयने काही निष्कर्ष समोर ठेवले आहेत.  बीसीसीआयने अटींसह केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या नावापुढे स्टारमार्क केलं आहे. दुसरीकडे, विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे उर्वरित तीन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा सहभाग बीसीसीआय वैद्यकीय संघाकडून फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन आहे, अशी टीप बीसीसीआयने लिहिली आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीपूर्वी हे दोन खेळाडू फिट होतील की नाही याबाबत शंका आहे. हे दोन्ही खेळाडू चौथ्या कसोटीपूर्वी फीट होतील असा अंदाज आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत यांच्या जागी नवोदीत खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. सरफराज खान तिसऱ्या कसोटीत डेब्यू करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान यांना पुन्हा संधी दिली आहे. तर आकाश दीपचा संघात समावेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. चौथी कसोटी रांची येथे 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. मालिकेतील पाचवी आणि अंतिम कसोटी 07 मार्चपासून धर्मशाळा येथे खेळवली जाईल.

इंग्लंड विरुद्ध अंतिम तीन सामन्यासाठी संघ

संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.