मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामने खेळणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या कसोटी मालिकेची प्रतिक्षा आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. तर वनडे वर्ल्ड कपसाठी निवृत्ती मागे घेणाऱ्या बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा आहे. टीम इंडियाला भारतात येऊन पराभूत करणं वाटतं इतकं सोपं नाही. त्यामुळे इंग्लंडसाठी ही मालिका आव्हानात्मक असणार आहे.
टीम इंडियाची भारतात अफलातून कामगिरी आहे. टीम इंडियाने गेल्या 12 वर्षांपासून भारतात अजिंक्य आहे. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, टीम इंडियाने 12 वर्षांपासून भारतात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाने भारतात अखेरची कसोटी मालिका 2012 मध्ये गमावली होती. तेव्हापासून टीम इंडियाचा विजयरथ सुस्साट सुरु आहे.
टीम इंडियाने 2012 पासून ते आतापर्यंत एकूण 16 मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियाने 46 सामन्यांपैकी फक्त 3 सामने गमावले आहेत. तर टीम इंडियाने 2012 पासून ते आतापर्यंत भारतात 36 सामने जिंकले आहेत. तर 7 सामने हे ड्रॉ राहिले आहेत.
आपल्या घरात सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम हा टीम इंडियाच्या नावावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 16 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने घरात 2 वेळा 10 मालिका विजयाची कामगिरी केली आहे. टीम इंडियाची आकडेवारी पाहता इंग्लंड विरुद्धही टेस्ट सीरिज जिंकेल, असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहच्यांना आहे. तो विश्वास भारतीय खेळाडूंना खरा ठरवला, तर तो टीम इंडियाचा घरातला सलग 17 वा कसोटी मालिका विजय ठरेल.
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली पोप. रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.