मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या उर्वरित कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांनी जिंकलेत. आता मालिका 1-1 ने बरोबरीत असून येत्या 15 फेब्रुवारीला तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या संघामध्ये परत एकदा फ्लॉप ठरलेल्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
टीम इंडियामध्ये हा खेळाडू गेल्या एक वर्षभरापासून खेळत आहे. या खेळाडूने आता सुरु असलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेमध्येही खास कामगिरी करता आली नाही. २०२३ साली डेब्यू केलेल्या या खेळाडूने सात कसोटी सामन्यांमध्ये 12 डावांमध्ये अवघ्या 221 धावा केल्या आहेत. यामधील 44 या खेळाडूचा सर्वाधिक स्कोर आहे. हे आकडे वाईट असले तरीपण त्याला संघात कोणाच्या वशिल्यावर तर नाही ना स्थान मिळत आहे? असा सवाल क्रिकेट चाहत्यांनी केली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतं की नाही? कारण के. एल. राहुल संघात आल्यावर त्याला बाहेर ठेवलं जावू शकतं. याचा संघाला असा फायदा होईल की फक्त कीपिंगसाठी भरत याला संधी देण्यापेक्षा राहुल हा कीपिंगसह बॅटींग करेल. त्यामुळे आणखी एका खेळाडूला गरजेनुसार खेळवता येईल. के एस भरत याला ऋष पंत याच्या जागी संधी मिळाली होती. पंत याचा अपघात झाला त्यानंतर राहुलची दुखापत यामुळे त्याला संघात जागा मिळाली होती.
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल (फिटनेस), रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरैल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा (फिटनेस), अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार और आकाश दीप.