मुंबई | अफगाणिस्तानला 3-0 ने टी 20 मालिकेत लोळवल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाची आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीच्या हिशोबाने ही कसोटी मालिका टीम इंडिया-इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. इंग्लंडने संपूर्ण मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. तर बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या कसोटी मालिकेतील सलामीचा सामना हा 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या काही तासांआधी टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
इंग्लंड टीमचा 24 वर्षीय युवा फलंदाज हॅरी ब्रूक कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. हॅरीने वैयक्तिक कारणामुळे मालिकेतून माघार घेतली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. हॅरी ब्रूकने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे विनंती केली होती. त्यानुसार बोर्डाने विनंती मान्य केली. त्यामुळे हॅरी तात्काळ इंग्लडंला रवाना होणार आहे.
दरम्यान आता हॅरी ब्रूकच्या जागी अद्याप इंग्लंड टीममध्ये कुणाचाही समावेश करण्यात आलेला नाही. लवकरच हॅरी ब्रूकच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली जाईल, अशी माहिती आयसीसीने दिलेली आहे. त्यामुळे आता हॅरीच्या जागी कुणाची वर्णी लागते,याकडे इंग्लंडच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
हॅरी ब्रूक टेस्ट सीरिजमधून ‘आऊट’
A blow for England ahead of their five-match Test series against India 👀
Details 👇https://t.co/o6Vs5L2Xj6
— ICC (@ICC) January 21, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली पोप. रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.