IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा दिलासा!

| Updated on: Jan 09, 2024 | 7:04 PM

India vs England Test Series 2024 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनीशप 2023-2025 साखळीच्या हिशोबाने टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका अनेक हिशोबाने महत्त्वाची आहे.

IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा दिलासा!
Follow us on

मुंबई | टीम इंडिया नववर्षात अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. एकूण 3 सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टीममध्ये कमबॅक झालंय. त्यामुळे अफगाणिस्तानचं टेन्शन वाढलंय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलेलं असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाच्या हार्दिक पंड्या हा दुखापतीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून बाहेर आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी यालाही दुखापत आहे. टीम इंडियाचा ओपनर ऋतुराज गायकवाड यालाही दुखापत झालीय. त्यामुळे ऋतुराजची अफगाणिस्तान विरुद्ध निवड करण्यात आली नाही.

हे सुद्धा वाचा

ऋतुराज गायकवाड याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली होती. ऋतुराजच्या बोटाला दुसऱ्या वनडे दरम्यान ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे ऋतुराजची अफगाणिस्तान विरुद्ध निवड करता आली नाही.

टीम इंडिया अफगाणिस्ताननंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टी 20 वर्ल्ड कपआधीची टीम इंडियाची शेवटची मालिका असणार आहे. त्याआधी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुराज तिसऱ्या टेस्टआधी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋतुराज तिसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध असू शकतो.

दरम्यान ऋतुराज सध्या बंगळुरुतील एनसीएमध्ये आहे. ऋतुराज फिटनेसवर मेहनत घेत आहे. ऋतुराज येत्या 10 दिवसात होऊ शकतो. त्यानंतर ऋतुराज महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळू शकतो.

ऋतुराज लवकरच टीम इंडियात परतणार

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 25 ते 29 जानेवारी, हैदराबाद.

दुसरा सामना, 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम.

तिसरा सामना, 15 ते 19 फेब्रुवारी, राजकोट.

चौथा सामना, 23 ते 27 फेब्रुवारी, रांची.

पाचवा सामना, 7 ते 11 मार्च, धर्मशाला.