IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत बीसीसीआयकडून ‘या’ तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता

| Updated on: Jan 13, 2024 | 12:33 PM

IND vs ENG Test Series : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीयने टीमची घोषणा केली आहे. खराब प्रदर्शनामुळे संघातून तीन खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये एका स्टार खेळाडूचाही समावेश आहे.

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत बीसीसीआयकडून या तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात (IND vs ENG Test Series) पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींसाठी बीसीसीआयने टीम जाहीर केली आहे. या मालिकेमधून टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या स्टार ऑल राऊंडरचाही समावेश आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार असणार आहे. आता पार पडलेल्या आफ्रिकेविरूद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. या मालिकेमधील तीन खेळाडू ज्यांना इंग्लंडविरूद्ध संघात कायम ठेवलं गेलं नाही. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, अभिमन्यू ईश्वरन यांनी डच्चू देण्यात आला आहे. शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्ण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही. प्रसिद्ध कृष्णाने कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यालाही काही छाप पाडता आली नाही.

रोहित शर्मा याने प्रसिद्ध कृष्णा याला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली होती. मात्र प्रसिद्धला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. तिसरा खेळाडू हा अभिमन्यू ईश्वरन असून त्यालाही वगळण्यात आलं आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या जागी त्याला संघात जागा मिळाली आहे. आता तिघांनीही संघात आपली जागा तयार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये चार स्पिनर्सला संधी दिली गेली आहे. ही एक चाल असू शकती कारण भारतामध्ये स्पिनर्सला पिचवर चांगली मदत मिळते. त्यामुळे वींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांना संघात स्थान दिलं गेलं आहे.

पहिल्या-दुसऱ्या टेस्टसाठी स्क्वॉड

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.