Video : बेन डकेटला बाद करण्यासाठी शुबमन गिलने घेतली उलट्या दिशेने धाव, काही कळायच्या आतच…

| Updated on: Mar 07, 2024 | 1:19 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज घेऊनच हा निर्णय घेतला असावा. त्याप्रमाणे झॅक क्राऊली आणि बेन डकेट यांनी सुरुवात केली. पण ही जोडी फोडण्यात खऱ्या अर्थाने शुबमन गिलची मेहनत कामी आली.

Video : बेन डकेटला बाद करण्यासाठी शुबमन गिलने घेतली उलट्या दिशेने धाव, काही कळायच्या आतच...
Video : शुबमन गिलचे जबरदस्त प्रयत्न, आधी वाटलं पकडणं कठीण; पण व्हायचं तेच झालं
Follow us on

मुंबई : इंग्लंड विरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 3-1 ने आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे पाचवा सामना औपचारिक असला तरी शेवट गोड करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवरही या सामन्याचा निकाल प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे दोनी संघ विजयासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झॅक क्राउली आणि बेन डकेट ही जोडी मैदानात आली. या दोघांनी इंग्लंडला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे पहिल्या विकेटसाठी भारतीय गोलंदाज कसोशीने प्रयत्न करत होते. पण यश काही हाती लागत नव्हतं. रोहित शर्माने जवळपास गोलंदाजीतील सर्वच अस्त्र बाहेर काढली होती. पण यश मिळालं ते फिरकीपटू कुलदीप यादवला..पण याचा महत्त्वाचा वाटा हा शुबमन गिलचा होता. कारण उलट धावत जाऊन झेल घेणं वाटतं तितकं सोपं नाही.

संघाचं 18वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक कुलदीपच्या हाती रोहित शर्माने सोपवलं. स्कोअरबोर्डवर 55 धावा होत्या. कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूवर क्राउलेने चौकार मारला. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेऊन डकेटला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर डकेटने चौकार मारून कुलदीपला बॅकफूटवर ढकललं. पाचवा चेंडू निर्धाव गेला आणि सहाव्या चेंडूवर डकेट जाळ्यात अडकला.

ऑफ साईडला मारताना चेंडू वर चढला. शुबमन गिलने शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि उलट्या दिशेने धावत गेला. एक क्षण असं वाटत होतं की झेल घेणं कठीण आहे. पण शुबमन गिल चेंडूखाली पोहोचला आणि कठीण असा झेल घेतला. त्यामुळे बेन डकेटची खेळी 27 धावांवर संपुष्टात आली. तसेच टीम इंडियाला पहिली विकेट मिळाली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेट), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन