टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 326-5 विकेट होत्या. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आण जडजाने शतके केलीत. पदार्पणवीर सर्फराज खान याची सर्वत्र चर्चा होत आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंडला घाम फोडला पण आपल्याच खेळाडूने त्याचा घात केला.
रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनाही शतके केलीत. रोहित 131 धावा काढून आऊट झाला. तर जडेजा 110 धावा करून नाबाद आहे. सर्फराज खान यानेही आक्रमक अर्धशतकी खेळी केली धावगतीला वेग दिला.
पहिलाच सामना असल्याने सर्फराज याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. सर्फराजनेही मिळालेल्या संधीचं सोनं करत निवडकर्तांना त्यांनी घेतलेला निर्णय सार्थ ठरवला. जसा सर्फराज खेळायला आला तेव्हापासूनच त्याने इंग्लंडच्या बॉलर्सचा समाचार घ्यायला सुरूवात केली होती.
सर्फराज खान याने अवघ्या 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता. अर्धशतक झाल्यावर त्याच्या बॅटला चांगलीच धार आलेली दिसली. गडी सहज शतक करणार सर्वांना वाटत होतं. मात्र टीम इंडियामधील खेळाडूने त्याची विकेट घेतली.
रविंद्र जडेजा 99 धावांवर खेळत होता, त्याने चेंडू प्लेड केला आणि धाव घेण्यासाठी कॉल केला. मात्र अर्ध्यातच माघारी फिरला तोपर्यंत सर्फराज पिच सोडून पुढे गेला होता. मार्क वुडने केलेल्या अचून थ्रो 62 धावांवर त्याला माघारी परतावं लागलं. रोहित शर्माही नाराज झालेला दिसला.