राजकोट : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा 434 धावांनी पराभव झाला आहे. सामना संपल्यानंतर ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने कसोटी फॉरमॅटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने केलेल्या नाबाद 214 धावांची द्विशतक खेळी केली. टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर दोन तासांच्या आतमध्ये इंग्लंडचा संघ अवघ्या 122 धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यामध्ये सरफराज खान याने डेब्यू केला. जयस्वालने द्विशतक पूर्ण धाव घेतली त्यावेळी सरफराज खान याने मैदानात पाहा काय केलं?
सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल दोघे मैदानात होते. जयस्वाल याचं द्विशतक पूर्ण होण्याआधी सरफराज खान याने दुसऱ्या अर्धशताला गवसणी घातली. यादरम्यान जयस्वाल याने दोन धावा घेतल्या नाहीत म्हणून सरफराज त्याच्यावर भडकला होता. त्यानंतर सरफराज याने आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. सामन्याच्या 90 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर एकेरी धाव घेत जयस्वाल याने आपलं करियरमधील दुसरं द्विशतक पूर्ण केलं.
Celebration of #SarfarazKhan says it all
No hindu, no muslim pure love for their partners
This is what sports mean#YashasviJaiswal #INDvENG pic.twitter.com/oynw0VDHVJ— Sherlock Ohms (@Wanmohnev) February 18, 2024
ज्यावेळी दोन्ही खेळाडी एकेरी धावा घेत होते त्यावेळी दुसऱ्या बाजूने धावत असलेला सरफराजही आनंद व्यक्त करताना दिसला. आपल्या सहकारी खेळाडूने मोठा पराक्रम केल्यावर त्याचा आनंद मोकळ्या मनाने साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकरी सरफराज खान यांचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.