भारतीय संघाला गेल्या 11 वर्षांपासून सुरु असलेल्या आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी आहे. कारण आयसीसी टी20 वर्ल्डकप 2024 जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाला इंग्लंडकडून जुना हिशेब चुकता करण्याची संधी आहे. 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं. भारताने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य एकही विकेट न गमवता पूर्ण केलं होतं. असं असलं तरी सुरु असलेल्या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया मागच्या पराभवाचा वचपा काढू शकते. टी20 क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 23 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 12 सामन्यात भारताने तर 11 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये दोन वेळा आमनेसामने आले आणि दोन-दोन विजय मिळवले आहेत.
उपांत्य फेरीत रोहित शर्माकडून पुन्हा एकदा अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने 92 धावांची खेळी केली होती. पण दुसरीकडे, विराट कोहलीच्या फॉर्ममुळे चिंता वाढली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये असून नसल्यासारखा झाला आहे. त्याच्या बॅटमधून अजूनही हव्या तशा धावा येत नाहीत. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात त्याने एकूण 66 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या ऐवजी यशस्वी जयस्वालचा विचार होऊ शकतो. पण रोहित शर्मा तसा काही निर्णय घेणार आहे. विराटची बॅट चालत नसली तरी त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालला पुन्हा एकदा बेंचवरच बसावं लागेल.
सूर्यकुमार यादवसाठी तसा कोणता पर्याय नाही. पण शिवम दुबेऐवजी यशस्वी किंवा संजू सॅमसनचा विचार होऊ शकतो. पण शिवम गोलंदाजीसाठी एक पर्याय आहे. त्यामुळे शिवमला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढणं कठीण आहे. तर फिरकीपटूची जबाबदारी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या खांद्यावर असेल. तर जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह और अर्शदीप सिंग.