मुंबई : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारताने आपल्या खिशात घातला आहे. इंग्लंडला ४३४ धावांनी पराभूत करत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह टीम इंडियाची विजयी टक्केवारी वाढली आहे. तसेच गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा संघाने आतापर्यंत चार पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना गमावला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ७५ असून पहिल्या स्थानी आहे. तर भारताने ७ पैकी ४ सामने जिंकत, २ सामन्यात पराभवाचं तोंड पाहात आणि एक सामना ड्रॉ करत गुणतालिकेत विजयी टक्केवारी ५९.५२ इतकी आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दोन गुणांची पेनल्टी बसली होती. त्यामुळे विजयी टक्केवारी दोन गुणांनी घटली आहे. अन्यथा भारताचे गुण ६१.५२ इतके असते. ऑस्ट्रेलियाने एकूण १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ६ सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयी टक्केवारी ५५ सह तिसऱ्या स्थानी आहे.
बांगलादेशने एकूण दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यात एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ५० असून चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानने एकूण ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात २ सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर स्लो ओव्हर रेटसाठी दोन गुणांची पेनल्टी बसली आहे. त्यामुळे ३६.६६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
वेस्ट इंडिजने ४ पैकी एका सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे.त्यामुळे विजयी टक्केवारी ३३.३३ राहिली असून सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडला सर्वाधिक फटका बसला आहे. इंग्लंडने एकूण ७ सामने खेळले असून ३ सामन्यात विजय, ३ सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. तसेच १९ गुणांची पेनल्टी बसली आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी २५ असून सातव्या स्थानी आहे.
दक्षिण अफ्रिकेने एकूण ४ सामने खेळले असून ४ पैक एका सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. विजयी टक्केवारी २५ सह आठव्या स्थानी आहे. तर श्रीलंकेने आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले असून दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी शून्य असून सर्वात शेवटच्या स्थानी आहे.