मुंबई : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. पहिला सामना 18 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता असणार आहे. विशेष म्हणजे तिन्ही सामने आयर्लंडच्या डब्लिन मैदानातच होणार आहेत. त्यामुळे या मैदानावर कोणते खेळाडू कमाल करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आतापर्यंत टीम इंडिया आणि आयर्लंड पाच वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे तिन्ही सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. जसप्रीत बुमराह यांच्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर या मालिकेतून पुनरागमन करत आहे. त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पूर्वीप्रमाणेच बुमराह भेदक गोलंदाजी करेल अशी आशा आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात होणारे टी20 सामना डब्लिन मैदानात होणार आहेत. फलंदाजीला पूरक मैदान आहे. पण वेगवान गोलंदाजांना मदत करणारं पिच आहे. इतकंच काय तर मधल्या टप्प्यात फिरकीपटूही कमाल करू शकतात. पहिल्या फलंदाजी करणारा संघ 160 धावा अंदाजे करू शकतो. तर या धावांचं आव्हान गाठणं सोपं असल्याचंही दिसून आलं आहे. धावा चेस करताना विजयी टक्केवारी ही 60 टक्के इतकी आहे.
टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रवि बिश्णोई, प्रसिद कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, अवेश खान
आयर्लंड : पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, रॉस अडायर, हॅरी टॅक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँपर, जॉर्ज डॉकरेल, फिओन हैंड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क अडायर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, थियो वॅन वोर्कोम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग