नवी दिल्ली : टी-20 (T-20) T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. भारतानं (IND) काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. पाऊस असल्यानं जवळपास अडीच तासानंतर सामना सुरू होण्यास उशीर झाला. यामुळे पंचांनी षटके कापून सामना 12-12 षटकांचा केला. सामना सुरु झाल्यानंतर पहिले फलंदाजी करताना आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून सामना जिंकला. दीपक हुडा 29 चेंडूत 47 धावा करून नाबाद राहिला आणि दिनेश कार्तिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियानं आयर्लंडविरुद्ध 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दरम्यान, यामध्ये भुवनेश्वर कुमारनं विक्रम केलाय. तोही विश्वविक्रम केलाय. तो काय आहे, ते जाणून घेऊया…
या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने आयर्लंडच्या डावाच्या पहिल्याच षटकात इतिहास रचला. यामुळे भुवनेश्वरची देखील जास्तीत जास्त चर्चा होती. भुवनेश्वरनं विश्वविक्रम केल्यानं ही चर्चा रंगली होती.
भुवनेश्वर कुमार टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्ले ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं आयर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात विरोधी कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला बोल्ड केलं. अँड्र्यू बालबर्नीला दोन चेंडूंच्या खेळीत एकही धाव करता आली नाही. T20 सामन्यातील पॉवरप्लेमध्ये भुवीची ही 34वी विकेट होती. पॉवरप्ले ओव्हरमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Bhuvi, Avesh and Hardik pick a wicket apiece as Ireland are 52/3 after 6 overs.
Live – https://t.co/490Pf1BPNa #IREvIND pic.twitter.com/UJeDNyN9s4
— BCCI (@BCCI) June 26, 2022
आयर्लंडने पहिल्या दोन षटकात दोन गडी गमावल्याने भारताला 109 धावांचे लक्ष्य दिलं होतं . चौथ्या षटकात संघाला तिसरा धक्का बसला. यानंतरही त्यांनी भारतासमोर विजयासाठी 109 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हॅरी टेक्टरनं 33 चेंडूत 64 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. भारताकडून भुवनेश्वर कुमारशिवाय हार्दिक पांड्या, आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.