मुंबई : जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर गेली आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर जसप्रीत बुमराह मैदानात परतणार आहे. पण पहिल्याच टी20 सामन्यापूर्वी आयर्लंडच्या डबलिनमधून वाईट बातमी समोर आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जसप्रीत बुमराहची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण आयर्लंड विरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यावर पावसाचं संकट ओढावलं आहे. सामन्याच्या काही तासांपूर्वीच आयर्लंडच्या हवामान खात्यानं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आजचा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
सामन्याच्या काही तासांआधी डबलिनच्या हवामान खात्यानं पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट पाहता या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे वीज जाण्याची शक्यताही वर्तवली आहे. तसेच प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारी दुपारी रिमझिप पाऊस झाला पण संध्याकाळी आणि रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे.
⚠️#StatusYellowWind Warning issued⚠️
Affected areas: Leinster & Munster
Potential Impacts:
• Damage to temporary structures.
• Travel disruption.
• Power outages.
• Wave overtopping.Valid: 9pm Friday 18/08 to 6am Saturday 19/08
Full details⬇️https://t.co/ZsjQsKCXDy pic.twitter.com/pAUkswbFLr
— Met Éireann (@MetEireann) August 18, 2023
हवामानाचा अंदाज प्रत्येक क्षणाला बदलत आहे. जर पाऊस झाला नाही तर नियोजित वेळेत सामना सुरु होईल. पण पाऊस झाला आणि काही तासात संपला तर मात्र सामना उशिराने सुरु केला जाऊ शकतो. असं असलं तरी टीम इंडिया या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरू शकते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वा, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन/जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर/शहबाज अहमद, अर्शदीप सिंह, रवि बिष्णोई, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा
आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.