नवी दिल्ली : भारतानं (IND) काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. टी-20 (T-20) T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. पावसामुळे सुमारे अडीच तासांनंतर सामना सुरू झाला. पंचांनी षटके कापून सामना 12-12 षटकांचा केला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून सामना जिंकला. दीपक हुडा 29 चेंडूत 47 धावा करून नाबाद राहिला आणि दिनेश कार्तिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियानं आयर्लंडविरुद्ध 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना मंगळवारी होणार आहे.
For his economical spell of 1/11 – @yuzi_chahal was the player of the match in the 1st T20I ??
हे सुद्धा वाचाA 7-wicket win for #TeamIndia to start off the 2-match T20I series against Ireland ?#IREvIND pic.twitter.com/eMIMjR9mTL
— BCCI (@BCCI) June 26, 2022
सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या दोन षटकांत संघाने दोन विकेट गमावल्या होत्या. भुवनेश्वर कुमारनं पहिल्याच षटकात कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला क्लीन बोल्ड केलं. बलबर्नी शून्यावर बाद झाला. यानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्यानं दुसऱ्याच षटकात पॉल स्टर्लिंगला दीपक हुडाच्या गोलंदाजीवर झेलबाद केलं. स्टर्लिंगला चार धावा करता आल्या. यानंतर पाचव्या षटकात गॅरेथ डेलानी यष्टिरक्षक कार्तिकला आवेश खानकडून झेलबाद केलं. डेलेनी आठ धावा करू शकला. आयर्लंडनं 22 धावांत तीन विकेट गमावल्या.
.@HoodaOnFire was the pick of the #TeamIndia batters and was our top performer from the second innings ?#IREvIND pic.twitter.com/jsZsjxbTZ5
— BCCI (@BCCI) June 26, 2022
त्यानंतर हॅरी आणि लॉर्कन टकर यांनी आयर्लंडचा डाव सांभाळला आणि चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलनं हॅरीला अक्षर पटेलकडून झेलबाद कंले. टकरला 16 चेंडूत 18 धावा करता आल्या. या खेळीत त्यानं दोन षटकार मारले. त्याचवेळी, हॅरी पहिल्या 30 चेंडूंमध्ये आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावलं.
शेवटच्या षटकांमध्ये त्यानं खूप धावा केल्या. हॅरी टेक्टरने 33 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या. याशिवाय जॉर्ज डॉकरेलही चार धावांवर नाबाद राहिला. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक, आवेश आणि चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. शेवटच्या पाच षटकात आयर्लंडने 52 धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली.
Thank you to our fans in Ireland and across the UK for turning out in large numbers and cheering for #TeamIndia. ????
See you again on Tuesday. ?? #IREvIND pic.twitter.com/1UUm2m4D0g
— BCCI (@BCCI) June 26, 2022
109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारताला पहिला झटका एकूण 30 धावांवर बसला. इशान किशन 11 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 26 धावा काढून बाद झाला. यानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडूवर क्रेग यंगकडे विकेट गमावली.
सूर्या खाते न उघडताच आऊट झाला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यानं दीपक हुडाच्या साथीने हार्दिकसोबत तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. हार्दिक 12 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. यानंतर दीपक हुडाने दिनेश कार्तिकच्या साथीनं टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं. हुड्डाला अर्धशतक झळकावता आलं नाही आणि 29 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. कार्तिक एका चौकाराच्या मदतीने पाच धावा करून नाबाद राहिला. अशा प्रकारे टीम इंडियाने सात विकेट्स राखून विजय मिळवला.