मुंबई : टीम इंडियामध्ये आयपीएलमधील स्टार खेळाडू रिंकू सिंग याची संघात निवड झाली आहे. पहिल्यांदाच रिंकू याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेमध्ये त्याची निवड झाली नव्हती त्यामुळे क्रिकेट चाहतेही नाराज झाले होते. संघर्ष करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर रिंकू सिंग याने इथपर्यंतचा प्रवास केला आहे. अखेर त्याला कष्टाचं फळ मिळालं असून टीम इंडियाच्या जर्सीमध्ये त्याला पाहता येणार आहे.
रिंकू सिंग याच्या यशामध्ये आयपीएलमधील केकेआर फ्रँचायझीचा मोठा वाटा आहे. कोलकाताकडून रिंकू गेली अनेक वर्षे खेळत आहे मात्र मागील सीझनमध्ये सलग पाच षटकार ठोकत त्याने सर्व जगभरातील क्रिकेट रसिकांना आपली दखल घ्यायली लावली. रिंकूच्या करिअरचा तोच टर्निंग पॉईंट ठरला आणि आता त्याची टीम इंडियामध्ये निवड झालीये.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खानने रिंकूसाठी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाधील फेमस डायलॉग घेतला. तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर पूर्ण जग तुम्हाला ती मिळवून देण्याचा प्रयत्न करतं. असा डायलॉग बॅकग्राऊंडला असताना रिंकूचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास या व्हिडीओमध्ये दाखवला आहे.
??
Rinku Singh has been called up for #IREvIND ?#RinkuSingh | #IREvIND | #AmiKKR pic.twitter.com/XR5Nd1kOmO
— KolkataKnightRiders (@KKRiders) July 31, 2023
रिंकू सिंग मूळचा उत्तर प्रदेशमधील अलीगढ इथला आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची, गरिबीत पूर्ण बालपण काढलं. वडील सिलिंडर डिलीव्हरीचं काम करायचे, त्यामुळे रिंकू साफसफाईचं काम करू लागला. काही दिवसांनी तो मिळेल ते काम करू लागला आणि गरिबीला कधी लाजला नाही. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील कामगिरीच्या जोरावर त्याला केकेआरने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. रिंकूनेही संंधीचं सोनं केलं आणि आज तोच रिंकू टीम इंडियामध्ये खेळताना दिसणाार आहे.
दरम्यान, रिंकू सिंग याल आयर्लंडविरूद्धच्या सामन्यामध्ये प्लेईंग ११ मध्ये संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जसप्रीत बुमराह (C), ऋतुराज गायकवाड (VC), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (W), जितेश शर्मा (W), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.