IND vs IRE : यशस्वी आणि ऋतुराज यांना मिळाली नशिबाची साथ, दोघांनी आशा सोडल्या होत्या पण…Watch Video

| Updated on: Aug 18, 2023 | 10:08 PM

आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात चमकण्याची नामी संधी नवख्या खेळाडूंकडे आहे. कारण चांगल्या खेळीमुळे आशिया आणि वर्ल्डकप संघात निवड होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एक चूक महागात पडू शकते पण नशिबाची साथ असेल तर..

IND vs IRE : यशस्वी आणि ऋतुराज यांना मिळाली नशिबाची साथ, दोघांनी आशा सोडल्या होत्या पण...Watch Video
Watch : आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात यशस्वी आणि ऋतुराज यांच्यापैकी एकाची विकेट गेल्यातच जमा होती, पण झालं असं की..!
Follow us on

मुंबई : भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात तीन सामन्याची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत कर्णधार जसप्रीत बुमराह याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं आहे. आयर्लंडकडून कर्टिस कॅम्पर आणि बॅरी मॅकार्थी याने चांगली खेळी केली. कॅम्परने 39, तर बॅरीने नाबाद 51 धावांची खेळी केली. भारताकडून बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिष्णोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर अर्शदीपला एक गडी बाद करण्यात यश मिळालं. विजयासाठी दिलेल्या 140 धावांचं पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात उतरली. दोघांकडे चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे. पण एक क्षण या दोघांपैकी एकाची विकेट जाण्याची शक्यता होती. पण दोघांना नशिबाची साथ मिळाली.

नेमकं काय झालं?

आयर्लंडकडून दुसंर षटक जोशुआ लिटल याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्याकडून गडबड झाली. लेग बाईज धाव घेण्याच्या नादात हा ना झालं आणि विकेट जाईल असंच वाटलं. पण दोघांची विकेट वाचली आणि दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. यशस्वी जयस्वाल 23 चेंडूत 24 धावा करून बाद झाला.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कर्णधार) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.

आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.