मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत काउंटडाऊन सुरु झालंय. या वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. त्याआधी टीम इंडिया आपल्या कोट्यातील दुसरा आणि अखेरचा सराव सामना खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धचा पहिला सराव सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना हा नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येईल हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सराव सामना 3 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सराव सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सराव सामना दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. तर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सराव सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सराव सामना मोबाईलवर डिज्नी प्ल्स हॉटस्टार या एपवर फुकटात पाहायला मिळेल.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.