बंगळुरु | टीम इंडियाचा कॅप्टन आणि ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा याने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये नेदरलँड्स विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रोहितने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. रोहितने कीर्तीमान केला आहे. रोहित टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहितआधी अशी कामगिरी करण्याचा बहुमान हा फक्त सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांनाच मिळाला आहे. रोहितने असं नक्की काय केलंय हे जाणून घेऊयात.
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून 14 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. रोहितने नेदरलँड्स विरुद्ध तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 वी धाव पूर्ण करताच हा महारेकॉर्ड आपल्या नावावर केला. तसेच टीम इंडियासाठी ओपनर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम हा वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने टीम इंडियासाठी वनडे, टी 20 आणि कसोटी या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 15 हजार 758 धावा केल्या आहेत.
वीरेंद्रे सेहवाग – 15 हजार 758 धावा.
सचिन तेंडुलकर – 15 हजार 335 धावा.
रोहित शर्मा – 14 हजार 47 धावा.
सुनील गावसकर – 12 हजार 258 धावा.
शिखर धवन – 10 हजार 867 धावा.
दरम्यान रोहितने नेदरलँड्स विरुद्ध आणखी एक अनोखा कारनामा केला. रोहितने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. रोहितच्या वनडे कारकीर्दीतील हे 55 वं तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे 100 वं अर्धशतक ठरलं. थोडक्यात काय तर रोहितचं नेदरलँड्स विरुद्धचं अर्धशतक त्याच्य आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 100 व अर्धशतक ठरलं. रोहितने नेदरलँड्स विरुद्ध 54 बॉलमध्ये 8 चौकार आणि 2 सिक्ससह 61 धावांची खेळी केली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.