IND vs NED | टीम इंडियाचा सलग नववा विजय, कॅप्टन रोहित काय म्हणाला?

| Updated on: Nov 13, 2023 | 2:57 PM

Rohit Sharma IND vs NED | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सलग 9 सामने जिंकून अजिंक्य राहण्याची कामगिरी केली. नेदरलँड्सला पराभूत केल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला जाणून घ्या.

IND vs NED | टीम इंडियाचा सलग नववा विजय, कॅप्टन रोहित काय म्हणाला?
Follow us on

बंगळुरु | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकला. टीम इंडियाने नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग नववा विजय मिळवला. टीम इंडियाने नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र नेदरलँड्स टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर 250 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या या विजयात सर्वांनीच योगदान दिलं. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल या तिघांनी अर्धशतकं केली. तर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं केली.

तर कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रोहित आणि विराट या दोघांनी अनपेक्षितपणे बॉलिंग केली आणि प्रत्येकी 1-1 विकेटही घेतली. टीम इंडियाच्या या विजयानंतर साऱ्या देशात जल्लोष करण्यात आला. टीम इंडियाने चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिलं. विजयानंतर कॅप्टन रोहित काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहितने सलग 9 सामन्यांमधील विजयानंतर टीम इंडियाच्या कामगिरी बाबत आनंद व्यक्त केला. आम्ही पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत शानदार कामगिरी केली. प्रत्येक खेळाडूने या विजयात योगदान दिलं. प्रत्येक जण जबाबदारी घेऊ इच्छित होता. वेगवेगळ्या ठिकाणी खेळणं एक आव्हान होतं, मात्र आम्ही चांगलं खेळलो”, असंही रोहितने नमूद केलं.

“आम्ही स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच एका वेळी एकाच सामन्याचा विचार केला आणि त्याकडे लक्ष केंद्रीत केलं. स्पर्धेत एकूण 11 सामने असल्याने एका वेळेस एका सामन्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं होतं. प्रत्येक सामना हा वेगवेगळ्या स्टेडियममध्ये होतो. त्यानुसार खेळणं आमच्यासाठी आवश्यक होतं, आम्ही तसचं केलं”, असं रोहितने म्हटलं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.