पल्लेकेले | नवख्या आणि नव्या दमाच्या नेपाळ क्रिकेट टीमने 3 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाला उघडं पाडलंय. नेपाळ टीमने आशिया कप 2023 मधील पाचव्या सामन्यात टीम इंडियाच्या धारदार समजल्या जाणाऱ्या बॉलिंगच्या चिंढड्या उडवल्या. टीम इंडियाच्या गचाळ फिल्डिंग आणि सुमार बॉलिंगचा पूरेपूर फायदा घेत नेपाळने धमाकेदार बॅटिंग केली. नेपाळने टीम इंडियाला विजयासाठी 50 ओव्हरमध्ये 231 धावांचं आव्हान दिलंय. नेपाळने 48.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 230 धावा केल्या. त्यामुळे बॅटिंगनंतर नेपाळ टीम इंडियासमोर कशी बॉलिंग करते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
नेपाळकडून ओपनर विकेटकीपर आसिफ शेख याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. आसिफने 97 बॉलमध्ये 8 फोर ठोकले. सोमपाल कामी याने 48 धावा केल्या. कुशल भुरटेल याने 38 धावा केल्या. दीपेंद्र सिंग आयरी याने 29 धावांचं योगदान दिलं. गुलशन झा 23 रन्स करुन माघारी परतला. तर इतरांना विशेष असं काही करता आलं नाही.
टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या तिघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली. टीम इंडियाने नेपाळला 50 ओव्हरआधी रोखलं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणि खेळाडूंना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाचा विकेटकीपर ईशान किशन, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या तिघांनी कॅच सोडल्या. त्यामुळे टीम इंडिया उघड पडली. दरम्यान आता टीम इंडिया 231 धावांचा कसा पाठलाग करते, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
टीम इंडियासमोर नेपाळचा धमाका
Innings Break!
An impressive bowling performance from #TeamIndia 👌 👌
3️⃣ wickets each for @imjadeja & @mdsirajofficial
1️⃣ wicket each @MdShami11, @hardikpandya7 & @imSharOver to our batters now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/i1KYESEf5t #AsiaCup2023 | #INDvNEP pic.twitter.com/TcbYFMj2lh
— BCCI (@BCCI) September 4, 2023
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.