हैदराबाद : टीम इंडियाने श्रीलंकेचा एकदिवसीय मालिकेत 3-0 ने सूपडा साफ केला. त्यानंतर आता टीम इंडियाचा सामना न्यूझींलड विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 18 जानेवारीला हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघात आतापर्यंत 113 वेळा आमनासामना झाला आहे. मात्र यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिलाय. टीम इंडियाने 113 पैकी 55 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. तर न्यूझीलंडने टीम इंडियाला 55 सामन्यात पराभूत केलंय. 1 सामना टाय झालाय. तर 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
या मालिकेत केएल राहुल विवाहासाठी सुट्टीवर आहे. तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. यामुळे आता टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्कीच बदल होणार आहे. श्रेयसच्या जागी रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याऐवजी संघात सूर्यकुमार यादवची जागा नक्की मानली जात आहे.
तर दुसऱ्या बाजूला केएल राहुलच्या जागी इशान किशनचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप आणखी मजबूत होईल. तर ऑलराउंड खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर असू शकतात.
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.
पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद
दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर