हैदराबाद : क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल याची वादळी खेळी पाहायला मिळाली. शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. शुबमन यासह टीम इंडियाकडून द्विशतक करणारा एकूण पाचवा फलंदाज ठरला. तसेच शुबमनने द्विशतक ठोकत मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत हा वर्ल्ड रेकॉर्ड करणं कोणत्याच फलंदाजाला जमलेलं नाही. मात्र शुबमनने वयाच्या 23 व्या वर्षी ही कामगिरी करुन दाखवलीय.
शुबमनने 19 चौकार आणि 9 सिक्सच्या मदतीने एकूण 208 धावांची खेळी केली. या दरम्यान शुबमनने 145 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं. शुबमन द्विशतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला आहे. शुबमनने वेगवान द्विशतक करण्याचा इशान किशन याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमनने वयाच्या 23 वर्ष 132 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे.
इशानने बांगलादेश विरुद्ध डबल सेंच्युरी केली. तेव्हा इशानचं वय हे 24 वर्ष 145 दिवस इतकं होतं. तर रोहित शर्माने वयाच्या 26 वर्ष 186 व्या दिवशी द्विशतक केलं.
अर्धशतक -52 बॉल.
शतक 87 बॉल.
दीडशतक – 122 बॉल.
द्विशतक – 145 बॉल.
A SIX to bring up his Double Hundred ??
Watch that moment here, ICYMI ??#INDvNZ #TeamIndia @ShubmanGill pic.twitter.com/8qCReIQ3lc
— BCCI (@BCCI) January 18, 2023
दरम्यान शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या या पहिल्याच सामन्यात 33 व्या ओव्हरमध्ये मोठा कीर्तीमान केला. शुबमनने ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चौका ठोकला. शुबमनने यासह 1 हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण केला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इशान किशनच्या नावावर आहे. इशानने अवघ्या 126 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं होतं. इशानने विंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला पछाडत हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. गिलने138 बॉलमध्ये ही कामगिरी केली होती.
टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (कॅप्टन), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिचेल सैंटनर, लॉकी फर्ग्यूसन, शिप्ले आणि टिकनर.