IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, ऋषभ पंत मैदानाबाहेर, काय झालं?

| Updated on: Oct 17, 2024 | 5:51 PM

India vs New Zealand 1st Test Day 2: टीम इंडियाच्या खेळाडूला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे.

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का, ऋषभ पंत मैदानाबाहेर, काय झालं?
rishabh pant ind vs nz 1st test
Follow us on

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी झालेल्या नाणेफेकीत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाने नाक कापलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला. टीम इंडियाची ही भारतातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. त्यानंतर न्यूझीलंडने आता पहिल्या डावात 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. अशात टीम इंडिया आधीच बॅकफुटवर असताना रोहितसेनेला आणखी एक मोठा झटका लागला आहे.

टीम इंडियाचा स्टार विकेटरीपर ऋषभ पंत याला दुखापत झाल्याने मैदान सोडून बाहेर जावं लागलं आहे. ऋषभ पंतला रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर विकेटकीपिंग करताना दुखापत झाली. पंतला झालेली ही दुखापत किती गंभीर आहे? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

नक्की काय झालं?

रवींद्र जडेजा न्यूझीलंडच्या डावातील 37 वी ओव्हर टाकत होता. जडेजाने या ओव्हरमधील टाकलेला सहावा आणि शेवटचा बॉल फिरला आणि पंतच्या गुडघ्याला लागला. त्यामुळे पंतला मैदान सोडावं लागलं.

ध्रुव जुरेलची एन्ट्री

ऋषभ पंतला मैदानाबाहेर जावं लागल्याने त्याच्या जागी आता ध्रुव जुरेल याला मैदानात बोलवण्यात आलं आहे. तसेच पंतच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. आता पंतच्या दुखापतीबाबत काय अपडेट येते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

पंत मैदानाबाहेर, सामन्याला मुकणार?

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.