IND vs NZ 1st Test : इंडिया-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे? जाणून घ्या

| Updated on: Oct 15, 2024 | 8:20 PM

India vs New Zealand 1st Test Live Streaming: टीम इंडियाने पहिल्या कसोटीआधी जोरदार सराव केला आहे. बांगलादेशनंतर टीम इंडिया न्यूझीलंडलाही पराभूत करण्यासाठी सज्ज आहे. जाणून घ्या उभयसंघातील पहिल्या सामन्याबाबत सर्वकाही.

IND vs NZ 1st Test : इंडिया-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे? जाणून घ्या
virat kohli and cheteshwar pujara ind vs nz
Image Credit source: bcci
Follow us on

टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात कसोटी आणि सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत बांगलादेश विरुद्ध टी 20i मालिका जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा मायदेशात कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. आता टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. रोहित शर्माच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. तर टॉम लॅथम न्यूझीलंडची धुरा सांभाळणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने ही मालिका फार महत्त्वाची आहे. मालिकेतील पहिला सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल? हे आपण जाणून घेऊयात.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना केव्हा?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना बुधवार 16 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडची सुधारित टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.