INDvsNZ, 2nd ODI : टीम इंडिया रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज जिंकणार?

| Updated on: Jan 20, 2023 | 2:09 AM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी 21 जानेवारीला शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दीड वाजता सुरुवात होणार आहे.

INDvsNZ, 2nd ODI : टीम इंडिया रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज जिंकणार?
Follow us on

रायपूर : टीम इंडियाने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात पराभूत करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाने 350 धावांचं आव्हान देऊनही अवघ्या 12 धावांनी विजय झाला. न्यूझीलंडने अखेरच्या ओव्हरपर्यंत कडवी झुंज दिली, मात्र अखेर पराभव झाला. आता मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा शनिवारी 21 जानेवारीला रायपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडसाठी हा ‘करो या मरो’चा सामना असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडिया मालिका विजयाच्या इच्छेने मैदानात येईल. या दुसऱ्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो.

कोण इन कोण आऊट?

कॅप्टन रोहित दुसऱ्या सामन्यातून ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला वगळू शकतो. सुंदर पहिल्या सामन्यात महागडा ठरला. त्याने बॉलिंग करताना 7 ओव्हरमध्ये 50 धावा लुटवल्या. तर त्याला एकही विकेट घेता आला नाही. रोहित सुंदरच्या जागी स्पिन ऑलराउंडर शाहबाज अहमदला संधी देऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

तसेच शार्दुल ठाकूर यालाही प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळू शकतो. शार्दुलने पहिल्या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 54 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. यापैकी 1 विकेट ही निर्णायक ठरली. मात्र त्यानंतरही शार्दुलला वगळलं जाऊ शकतं. तसेच कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनाही संधी देऊ शकतो.

दुसऱ्या वनडेसाठी संभावित प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शाहबाज अहमद, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

टीम न्यूझीलंड

टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर