न्यूझीलंड क्रिकेट टीमने कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि निर्णायक सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. न्यूझीलंडने पुण्यात होत असलेल्या सामन्यातील दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला 156 धावांवर ऑलआऊट करत 103 ची आघाडी घेतली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 198 धावा केल्या आहेत. इंग्लंडने अशाप्रकारे 301 धावांची भक्कम आणि मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. मात्र हा पराभव टाळायचा असेल तर रोहितसेनेला तिसऱ्या दिवशी कमबॅक करण्याशिवाय पर्याय नाही.
यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या युवा जोडीने न्यूझीलंडच्या 259 च्या प्रत्युत्तरात 1 बाद 16 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या रुपात पहिली विकेट गमावली होती. रोहित टीम इंडियाचा स्कोअर 1 असताना पहिल्या दिवशी भोपळा न फोडता आऊट झाला. त्यानंतर यशस्वी आणि शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन गिल 30 धावांवर बाद झाल्याने रोहितसेनेची स्थिती 2 बाद 50 झाली. इथून टीम इंडियाची पडझड झाली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी एकूण 9 विकेट्स गमावून 140 धावाच केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव हा 156 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला 103 धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडसाठी मिचेल सँटनर याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 53 षटकांमध्ये 5 विकेट्स गमावून 198 धावा केल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडकडे 303 धावांची भक्कम आघाडी झाली आहे. टॉम ब्लंडेल 30 आणि ग्लेन फिलिप्स 9 धावांवर नाबाद आहेत. तर त्याआधी कॅप्टन टॉम लॅथम याने सर्वाधिक 86 धावांचं योगदान दिलं. डेव्हॉन कॉनव्हे याने 17, विल यंग 23, रचीन रवींद्र 9 आणि डॅरेल मिचेल याने 18 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून पहिल्या डावात 7 विकेट्स घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर याने दुसऱ्या डावातही 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर आर अश्विन याने 1 विकेट मिळवली आहे.
दुसऱ्या दिवसाचा ‘गेम ओव्हर’
Stumps on Day 2
New Zealand extend their lead to 301 runs
Scorecard ▶️ https://t.co/3vf9Bwzgcd#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uFXuaDb11y
— BCCI (@BCCI) October 25, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.