टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा आणि निर्णायक कसोटी सामना हा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस करण्यात आला आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन टॉम लॅथन याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात भक्कम प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरली आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 बदल केले आहेत.
टीम इंडियाकडून पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल करण्यात आले आहेत. शुबमन गिल याचं पुनरागमन झाल्याने केएल राहुल याला बाहेर जावं लागलं आहे. शुबमनला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळता आलं नाही. कुलदीप यादव याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद सिराज याच्या जागी आकाश दीप याचा समावेश करण्यात आला आहे. तर न्यूझीलंडने 1 बदल केलाय. मॅट हॅनरी उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी मिचेल सँटनर याचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान पहिला सामना गमावल्याने भारतावर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. मायदेशात मालिका गमवायची नसेल, तर टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. आता 3 बदलांसह मैदानात उतरलेली रोहितसेना किवींना रोखण्यात यशस्वी ठरते का? याचं उत्तर हे सामन्याच्या निकालानंतरच मिळेल.
न्यूझीलंड ‘टॉसचा बॉस’
🚨 Toss Update 🚨
New Zealand win the toss and elect to bat in the 2nd Test in Pune.
Live – https://t.co/YVjSnKCtlI#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/LCj6ActryZ
— BCCI (@BCCI) October 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.