टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या सामन्यात न्यूझीलंडला मोठी भागीदारी करण्यापासून रोखलं आणि ठराविक अंतराने झटके देत 3 विकेट्स घेतल्या. मात्र त्यानंतर डॅरेल मिचेल आणि विल यंग या दोघांनी न्यूझीलंडचा डाव सावरत मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी या प्रयत्नात फार यशस्वी ठरु शकली नाही. रवींद्र जडेजा याने न्यूझीलंडला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही षटकांच्या अंतराने जडेजाने तिसरी विकेट घेत झहीर खानचा रेकॉर्ड ब्रेक केला.
रवींद्र जडेजा याने न्यूझीलंडच्या डावातील 45 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. जडेजाने विल यंग याला कॅप्टन रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट करत शतकापासून रोखलं. यंगने 138 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 71 रन्स केल्या. जडेजाने त्यानंतर मैदानात आलेल्या टॉम ब्लंडेल याला तिसऱ्याच बॉलवर क्लिन बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यासह न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला. न्यूझीलंडची स्थिती 44.5 ओव्हरमध्ये 5 बाद 159 अशी झाली.
त्यानंतर जडेजाने न्यूझीलंडला 8 ओव्हरनंतर (52.6) आणखी एक झटका दिला. जडेजाने ग्लेन फिलिप्स याला 17 बॉलवर बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे न्यूझीलंडची स्थितीत 6 बाद 187 अशी झाली आहे. जडेजा या तिसऱ्या विकेटसह टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला.
जडेजाची या सामन्यातील तिसरी विकेट ही त्याच्या कसोटी कारकीर्दीतील एकूण 312 वी विकेट ठरली. जडेजाने यासह झहीर खान आणि इशांत शर्मा या जोडीला मागे टाकलं. जडेजा यासह सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा तर दुसरा सक्रीय भारतीय ठरला.
टीम इंडियासाठी वेगवान 312 विकेट्स
Most wickets for India in Tests
619 – Anil Kumble (236 Innings)
533* – Ravichandran Ashwin (198 Innings)
434 – Kapil Dev (227 Innings)
417 – Harbhajan Singh (190 Innings)
312* – Ravindra Jadeja (145 Innings)
311 – Zaheer Khan (165 Innings)
311* – Ishant Sharma (188 Innings) pic.twitter.com/kxnAo9s7LO— CricTracker (@Cricketracker) November 1, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.