टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने मालिका आधीच गमावली आहे. न्यूझीलंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. अशात न्यूझीलंड तिसर्या सामन्यात टीम इंडियाला व्हाईटवॉश करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडिया लाज वाचवण्याचे प्रयत्न करणार आहे. न्यूझीलंडने पहिला सामना हा 8 विकेट्सने जिंकला होता. तर दुसर्या सामन्यात 113 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता.
टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने पुण्यात झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात उल्लेखनीय खेळी केली होती. यशस्वीने दुसऱ्या डावा 65 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. जयस्वालने या खेळीत 3 उत्तुंग षटकार खेचले होते. यशस्वी यासह कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी येऊन पोहचला. आता यशस्वीच्या निशाण्यावर महारेकॉर्ड आहे. यशस्वी हा रेकॉर्ड उद्धवस्त करताच इतिहास घडवेल.
एका वर्षात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रँडन मॅक्युलम याच्या नावावर आहे. मॅक्युलम याने 2014 या वर्षात 9 सामन्यांमध्ये 33 सिक्स खेचले होते. तर यशस्वी हा रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून 3 सिक्स दूर आहे. यशस्वीच्या नावावर 31 षटकारांची नोंद आहे.
ब्रँडन मॅक्युलम, न्यूझीलंड, 33 षटकार, 2014
यशस्वी जयस्वाल, टीम इंडिया, 31 षटकार, 2024
बेन स्टोक्स, इंग्लंड, 26 षटकार, 2022
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.