टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडने या मालिकेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तसेच नवा कर्णधाराचं नावंही जाहीर केलंय. तसेच 2 खेळाडूंची काही निवडक सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी कुणाला संधी दिलीय? तसेच टीम इंडिया विरुद्ध नेतृत्व कोण करणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टॉम लॅथम याला न्यूझीलंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केलं आहे. टीम साऊथी याच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव झाला. साऊथीने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसेच ऑलराउंडर मायकल ब्रेसवेल फक्त पहिल्याच सामन्यात खेळणार आहे. मायकल ब्रेसवेल त्यानंतर वैयक्तिक कारणामुळे मायदेशात परतणार आहे. त्यानंतर ब्रेसवेलच्या जागी उर्वरित 2 सामन्यांसाठी ईश सोढीला संधी देण्यात आली आहे.
श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विलियमसन याला दुखापतीमुळे टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेला मुकावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केनला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली होती. तेव्हापासून केनवर उपचार सुरु आहेत. तसेच केनला या दुखापतीमुळे भारत दौऱ्यावर निघण्यासाठी विलंब होणार आहे. त्यामुळे केनच्या जागी मार्क चॅपमॅन याचा समावेश करण्यात आला आहे.
टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम जाहीर
ICYMI | Our Test squad for the upcoming three-Test series against India, starting in Bengaluru next Wednesday. Watch all matches LIVE on @skysportnz 🏏 #INDvNZ #CricketNation pic.twitter.com/TzvMIpZSrH
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 8, 2024
पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.