मुंबई : शुबमन गिल याची बुधवारपासून क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे शुबमनने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ठोकलेलं द्विशतक. शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. तसेच शुबमन द्विशतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला. शुबमनने केलेल्या द्विशतकामुळे त्याचं चौफेर कौतुक होतंय. या द्विशतकानंतर शुबमनचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हारल झाला आहे.
व्हायरल व्हीडिओत शुबमन लाजलाय. त्यात झालं असं की स्टेडियममधून बाहेर जाताना गिल बसमध्ये होता. तेव्हा एक त्याचा चाहता धावून आला. शुबमनसोबत हस्तांदोलन केलं. यावेळेस त्याचा चाहता शुबमनला म्हणाला की सचिनकडे लक्ष ठेव. यानंतर शुबमन चांगलाच लाजला.
शुबमन गिल लाजला
Pyara Samajh gaya ? #INDvsNZ #ShubmanGill #SachinTendulkar #Sara #viratkholi pic.twitter.com/YYIWQYLFLM
— ?Mr Batra ? (@Btraaabackup) January 18, 2023
शुबमनने द्विशतक ठोकल्यानंतर त्याचं नाव पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकरसोबत जोडण्यात येत आहे. याआधीही सारा-शुबमन या दोघांची नावं जोडण्यात आली आहेत. मात्र द्विशतकानंतर पुन्हा या दोघांची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. शुबमनने द्विशतक ठोकल्याने सचिनने त्याचा साखरपूडा सारासोबत ठरवल्याचं गमतशीर ट्विट करण्यात आलं. हे असे आणि अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.
शुबमनने 19 चौकार आणि 9 सिक्सच्या मदतीने एकूण 208 धावांची खेळी केली. या दरम्यान शुबमनने 145 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं. शुबमन द्विशतक ठोकणारा युवा फलंदाज ठरला आहे. शुबमनने वेगवान द्विशतक करण्याचा इशान किशन याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमनने वयाच्या 23 वर्ष 132 व्या दिवशी ही कामगिरी केली आहे.
इशानने बांगलादेश विरुद्ध डबल सेंच्युरी केली. तेव्हा इशानचं वय हे 24 वर्ष 145 दिवस इतकं होतं. तर रोहित शर्माने वयाच्या 26 वर्ष 186 व्या दिवशी द्विशतक केलं.
अर्धशतक -52 बॉल.
शतक 87 बॉल.
दीडशतक – 122 बॉल.
द्विशतक – 145 बॉल.
टीम इंडियाने पहिला सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना हा शनिवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला हा सामना जिंकून सीरिजही जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसाठी हा करो या मरोचा सामना आहे. त्यामुळे दुसरा सामना हा निर्णायक होणार आहे.