इंदूर : टीम इंडियाने न्यूझीलंडला तिसऱ्या वनडेत पराभूत केलं. या विजयासह भारताने न्यूझीलंडला 3-0 अशा एकतर्फी फरकाने क्लीन स्वीप केलं. मात्र टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे जो विजयात व्हिलन ठरला आहे. या खेळाडूला संधी देऊन कॅप्टन रोहित शर्मा याने पायावर धोंडा मारुन घेतला. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसोबत या भारतीय खेळाडूचं वनडे करियरही धोक्यात आलं आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या खेळाडूची निराशाजनक कामगिरी राहिली. बॅटिंग असो किंवा बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर खेळाडू अपयशी ठरला. कॅप्टन रोहितने वॉशिंग्टन सुंदरला संधी देऊन चूक केली. सुंदरला या मालिकेतील सर्व म्हणजेच 3 सामन्यात संधी दिली. मात्र त्याने फक्त 3 विकेट्स घेतल्या. तसेच फक्त 21 धावा केल्या.
दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या सुंदरचं वनडे करिअर धोक्यात आलं आहे. कारण रवींद्र जाडेजा आता फीट झाला आहे. त्यामुळे जाडेजाचं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कमबॅक होईल. यामुळे वॉशिंग्टनला डच्चू मिळणार. यामुळे सुंदरची ही अखेरची वनडे मॅच असंच म्हटलं जात आहे.
सुंदरने मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 ओव्हरमध्ये 50 धावा लुटवल्या. तर बॅटिंग करताना 12 रन्स केल्या. दुसऱ्या वनडेत 2 विकेट्स घेतल्या. तर तिसऱ्या सामन्यात सुंदर पुन्हा फ्लॉप ठरला. त्याने 6 ओव्हरमध्ये 49 धावा दिल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.