मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने भिडणार आहेत. या वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघांची आमेनसामने येण्याची दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही टीम साखळी फेरीत भिडले होते. टीम इंडियाने त्या सामन्यात 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर आता दोन्ही संघ थेट सेमी फायनलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघांचं लक्ष्य हे सामना जिंकून अंतिम फेरीत पोहचण्याकडे आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच डीडी स्पोर्ट्सवर मोफत पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामना मोबाईलवर पाहण्यासाठी डिज्नी पल्स हॉटस्टार एपवर फुकटात पाहायला मिळेल.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम आणि विल यंग.