धर्मशाळा | वर्ल्ड कप 2023 मध्ये 2 तुल्यबल संघ टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन धर्मशाळा येथील स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वहे आणि विल यंग ही सलामी जोडी मैदानात आली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या ओपनिंग जोडीला बांधून ठेवलं. त्यांना मोठे फटके मारण्यापासून रोखलं. त्याच्याच दबाव न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दिसून आला आणि टीम इंडियाला फायदा झाला.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी सुरुवातीला चिवट बॉलिंग केली. त्यामुळे डेव्हॉन कॉनव्हे याला पहिल्या 3 ओव्हरमध्ये खातंही उघडता आलं नाही. त्याचा दबाब डेव्हॉनवर स्पष्ट दिसत होता. मोहम्मद सिराज सामन्यातील चौथी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर मारलेला फटका श्रेयस अय्यर याच्यापासून थोडा दूर होता. मात्र श्रेयसने बॉलवर अखेरपर्यंत लक्ष ठेवत झेप घेत अफलातून कॅच घेतला. त्यामुळे न्यूझीलंडला पहिला झटका लागला. डेव्हॉन कॉन्वहे झिरोवर आऊट झाला.
त्यानंतर मोहम्मद शमी याने न्यूझीलंडला दुसरा झटका देत आपली पहिली शिकार केली. शमीने आपल्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर विल यंग याला बोल्ड केलं. त्यामुळे पावर प्लेमधील पहिल्या 10 ओव्हर टीम इंडियाने आपल्या नावावर केल्या. न्यूझीलंडला 10 ओव्हरमध्ये 2 बाद 34 धावाच करता आल्या.
श्रेयस अय्यर याचा अप्रतिम कॅच
Good Catch for Shreyas Iyer and Well Strike by Siraj
Devon Conway c Iyer b Mohammed Siraj 0 (9b 0x4 0x6)#CWC23 #INDvsNZ #TeamIndia #ShreyasIyer #SuryakumarYadav #MohammedShami #RavindraJadeja pic.twitter.com/CVpFcJzih7— एम. राहुल (@mrahulmatoshri) October 22, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.