Shubman Gill याचा वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध मोठा कारनामा

| Updated on: Oct 22, 2023 | 8:44 PM

Shubman Gill World Cup 2023 | शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्ध 26 धावांची खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. शुबमनने अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे.

Shubman Gill याचा वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंड विरुद्ध मोठा कारनामा
Follow us on

धर्मशाळा | न्यूझीलंड टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 21 व्या सामन्यात टीम इंडियाला सलग पाचव्या विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं आहे. या विजयी धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची शानदार सुरुवात झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी 71 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित शर्मा 46 धावांवर आऊट झाला. रोहितनंतर युवा शुबमन गिल हा देखील 26 रन्स करुन आऊट झाला. मात्र शुबमनने या खेळीदरम्यान मोठा पराक्रम केला आहे. शुबमनने वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा कारनामा केला आहे.

शुबमन गिल याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये वेगवान 2 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. गिलने यासह अनेक दिग्गजांना एका झटक्यात मागे टाकलंय. यामध्ये अनेक आजी माजी फलंदाजांचा समावेश आहे. शुबमन गिल याला डेंग्यूमुळे वर्ल्ड कपमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळता आलं नाही. शुबमन ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध खेळू शकला नव्हता. मात्र शुबमनने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून कमबॅक केलं.

शुबमबनला कमी डावात वेगवान 2 हजार वनडे धावा करण्यासाठी 14 धावांची गरज होती. शुबमनने सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर ट्रेन्ट बोल्ट याला चौकार ठोकत 2 हजार धावांचा टप्पा पार केला. शुबमनने 38 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या.

शुबमन गिल याचा वर्ल्ड रेकॉर्ड

वनडेत वेगवान 2 हजार धावा

शुबमन गिल – 38 इनिंग.
हाशिम अमला – 40 इनिंग.
झहीर अब्बास – 45 इनिंग.
केविन पीटरसन – 45 इनिंग.
बाबर आझम – 45 इनिंग.
रॅसी वॅन डेर डुसेन – 45 इनिंग.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.