धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 21 वा सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे एचपीसीए स्टेडियम धर्मशाळा येथे करण्यात आले आहेत. टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सलग 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता कोण पाचवा सामना जिंकणार आणि कोणाची विजयी घोडदौड थांबणार हे स्पष्ट होईल. दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने न्यूझीलंड विरुद्ध टॉस जिंकला आहे. रोहितने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलंयं. त्यामुळे टीम इंडिया सलग पाचव्यांदा चेज करणार आहे.
टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या याने माघार घेतली आहे. तर शार्दुल ठाकुर याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर या दोघांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या दोघांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव हे दोघे कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष राहणार आहे.
दरम्यान टीम इंडिया-न्यूझीलंड या दोन्ही संघांना मोठा फटका बसला आहे. या सामन्यातून कर्णधार आणि उपकर्णधार हे बाहेर पडले आहेत. टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याला बांगलादेश विरुद्ध सामन्यात बॉलिंग दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे हार्दिक खेळत नाहीयेत. तर केन विलियमनस हा न्यूझीलंडचा नियमित कर्णधार आहे. केनने आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केलं होतं. मात्र त्याच सामन्यात बॅटिंगदरम्यान केनच्या हातावर बॉल लागल्याने त्याला दुखापत झाली. तेव्हापासून केन टीममधून बाहेर आहे. त्यामुळे केनच्या जागी आता टॉम लॅथम हा न्यूझीलंडचं नेतृत्व करतोय.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.