धर्मशाळा | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 21 व्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत. हा सामना रविवारी 22 ऑक्टोबरला धर्मशाळा येथील एचपीसीएच्या क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सर्वात तगडी टीम कोण आहे हे निकालानंतर स्पष्ट होईल. या सामन्यावर पावसाचं सावट आहे का, सामना पावसामुळे रद्द झाला तर काय, या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.
आतापर्यंत वर्ल्ड कप 2023 मध्ये एकही सामना पावसामुळे रद्द झालेला नाही. मात्र याच एचपीसीए स्टेडियममध्ये मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना हा पावसामुळे प्रभावित झाला, त्यामुळे सामान 43 ओव्हरचा खेळवण्यात आला. आता टीम इंडिया-न्यूझीलंड सामन्यात पाऊस होणार की नाही, झाला तर किती होईल, हवामान खात्याने काय सांगितलंय, हे जाणून घेऊयात.
हवामानाची माहिती देणाऱ्या एक्युवेदरनुसार, टीम इंडिया-न्यूझीलंड सामन्यात पाऊस होण्याची शक्यता ही 42 टक्के इतकी आहे. तर मैदान परिसरात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता अधिक आहे.
गूगल वेदरनुसार सकाळी 10 ते 1 दरम्यान पावसाची शक्यता अधिक आहे. तर सामना 2 वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या आधी पाऊस झाला, तर सामन्याला सुरुवात होण्यास निश्चित विलंब होईल. तसेच दुपारी 1 ते 4 दरम्यान पाऊस होण्याची शक्यता ही 18 टक्के आहे. तसेच पावसामुळे सामना रद्द झाला, तर दोन्ही टीमला प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळेल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड टीम | टॉम लॅथम (कॅप्टन), केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.