मुंबई : टीम इंडिया गेल्या तीन चार वर्षांपासून मोठ्या स्पर्धांमध्ये अपयशी ठरताना दिसत आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे प्रमुख फलंदाज फेल जात आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल हे आहेतच त्यासोबत मिडल ऑर्डरमध्ये जेवढे बदल केले तेसुद्धा काही यशस्वी झाले नाहीत. आशिया कपमधील पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातही टीम इंडियाची तशीच अवस्था झाली. यामुळे एक सवाल उपस्थित झाला आहे की रोहित शर्मा आणखी किती दिवस खोटं बोलत राहणार आहे. रोहित शर्मान ती गोष्ट मनावर घेतली नाही याचेच पडसाद मोठ्या सामन्यांमध्ये दिसत आहेत.
रोहित शर्मा आणि टीम इंडियातील फलंदाज डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर नांगी टाकताना दिसत आहे. आताच नाहीतर मागील आकडेवारी पाहिलीत की तुमच्या लक्षात येईल की, 2022 पासून 18 एकदिवसीय डावात रोहित शर्मा डावखुरा वेगवान गोलंदाज 5 वेळा त्याचा बळी ठरला आहे. दुसरीकडे, विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, या कालावधीत 22 डावांपैकी डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांनी त्याला 4 वेळा आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.
2022 पासून वन डे सामन्यांमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये 16 विकेट्स गेल्या आहेत. यासह धावांची सरासरी पाहिलीत तर अवघी 24.9 आहे. रोहितच काय संपूर्ण बॅटिंग लाईन अप डावखुऱ्या गोलंदाजांची शिकार होताना दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्मा तर त्यांचा गिर्हाइकच होत चालला आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये ट्रेंड बोल्ट यानेही टीम इंडियाला धक्के दिले होते. यावरून टीम इंडियाचा कर्णधार आणि इतर फलंदाजांना डावखुरे वेगवान गोलंदाज झेपत नसल्याचं स्पष्ट होतं.
गेल्या वर्षी टीम इंडियाच्या दौऱ्यावर होती तेव्हाही डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टोपली याने टीम इंडियाला सुरूंग लावला होता. याबाबत रोहितला विचारण्यात आलं होतं तेव्हा, डावखुऱ्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या पण टीम इंडियाची ही काही कमजोरी वगरे नाही आणि यात चिंता करण्यासारखीही कोणती गोष्ट नसल्याचं रोहित म्हणाला होता.
मार्चमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियावरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतही मिचेल स्टार्क याने टीम इंडियाच्या विकेट घेतल्या होत्या. तेव्हाही रोहितने, चांगले गोलंदाज हे विकेट घेणारच मग ते डावखुरे किंवा किंवा उजव्या हाताने गोलंदाजी करणारे असूदेत. टीम इंडिया याकडे फार काही लक्ष देत नसल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
दरम्यान, आता आशिया कपमध्येही रोहितची ही कमजोरी समोर आली आहे. वर्ल्ड कप आधी यावर काहीतरी उपाय शोधून काढल पाहिजे. नाहीतर वर्ल्डकपमध्येही आजचे पाढे परत अशी परिस्थिती आहे.