Ind vs pak : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी मोहम्मद कैफ याचा गिलला मोलाचा सल्ला, म्हणाला…

| Updated on: Sep 09, 2023 | 12:16 PM

Asia Cup IND vs PAK : आशिया कपमधील दुसऱ्यांदा भारत-पाक आमने-सामने येणार आहेत. युवा खेळाडू शुबमन गिल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर गिल याला माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने मोलाचा सल्ला दिलाय.

Ind vs pak : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी मोहम्मद कैफ याचा गिलला मोलाचा सल्ला, म्हणाला...
Follow us on

 मुंबई : टीम इंंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल दर्जेदार खेळाडू असून त्याने टीममध्ये आपलं स्वत: वेगळं स्थान निर्माण केलं. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शुबमन गिल याने शतक केलं आहे. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यापासून गिल अपयशी ठरत असलेला पाहायला मिळत आहे. आशिया कपमध्ये त्याला संघात स्थान मिळाल्यावर पाकिस्तानसमोर खेळताना तो अपयशी ठरलेला दिसला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये नेपाळविरूद्ध  नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. आता परत एकदा पाकिस्तानच्या गोलंदाजांंचं आव्हान गिलसमोर असणार आहे. याच पार्श्वभूमीवर गिल याला माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने मोलाचा सल्ला दिलाय.

काय म्हणाला मोहम्मद कैफ?

शुबमन गिलने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये त्याचा स्वाभाविक खेळ केला नाही. 32 चेंडूंचा सामना करत अवघ्या 10 धावा केल्या. यामध्ये त्याने फक्त एकच चौकार लगावला. त्यामुळे खेळापेक्षा गिलने त्याच्या मानसिकतेर काम करायला हवं. जर चेंडू स्विंग होत असेल तर पोझिशन घेऊन चेंडूंचा सामना करायला हवा आणि नेटमध्ये स्विंग चेंडूंचा जास्तीत जास्त सराव करण्याचा सल्ला मोहम्मद कैफने दिला.

शुबमन गिल गॅपमधून चौकार मारण्यात तरबेज आहे, मात्र पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात गिलने आपला मूळ खेळ बदलला. डिफेंड करण्याच्या नादात तो त्याचा स्वाभाविक खेळ विसरून गेला. पाकिस्तान विरूद्धचा पहिला सामना गिलसाठी काही चांगला गेला नाही.

हॅरिस रॉफने गिलला बोल्ड आऊट केलं. गिलने त्याचा मूळ खेळ केला तर त्याच्यावर जास्त दबाव येणार नाही. रविवारी होणाऱ्या सामन्यामध्ये गिल पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना कसा करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आशिया कपसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (C), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा