मुंबई : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाचा आणि पाकिस्तानमध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाला सुरूवातील धक्के देत बॅकफूटवर ढकलल्यानंतर युवा खेळाडू इशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला. इशान किशन शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठा शॉट मारण्याचा नादात आऊट झाला. त्यावेळी मैदानामध्ये पाकिस्तानचा खेळाडू हॅरिस रॉफने चुकीचे हातवारे केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी रॉफला धारेवर धरलं आहे.
हॅरिस रॉफची परत जिरवायला हवी, इशानला आऊट त्याच्याकडे पाहत चुकीचे हातवारे #INDVSPAK #RohitSharma #viratkholi #AsiaCup2023 #viral #म pic.twitter.com/kOgKLYwYKl
— Harish Malusare (@harish_malusare) September 2, 2023
टीम इंडियाच्या 4 विकेट गेलेल्या असताना दबावामध्ये बॅटींगला आलेल्या इशान किशनने पंड्याच्या साथीने डाव सावरला. दोघांनी एकेरी दुहेरी धावा करत स्कोरबोर्ड हलता ठेवला. सर्वात महत्त्वाच म्हणजे या एकेरी दुहेरी धावा घेत असताना जेव्हा मोठा शॉट खेळण्याची संधी मिळेल तेव्हा दोघांनाही मागेपुढे पाहिला नाही.
या धावांमुळे टीम इंडियावरचा दबाव काही प्रमाणात झाला आणि त्यानंतर दोघांनी खुलून बॅटींग केली. अर्धशतक झाल्यावर इशानने पाकिस्तानच्या बॉलर्सवर आक्रमण करायला घेतलं. पठ्ठ्याने 81 बॉलमध्ये 82 धावा केल्या यामध्ये 9 चौकार आणि 2 षटकार मारले. हॅरीस रॉफच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला आणि पाकिस्तान संघाने सुटकेटा श्वास घेतला.
दरम्यान, इशानला आऊट केल्यावर हॅरीस रॉफने निघ इथून मैदानातून चालता हो, अशा अर्थाने चुकीच्या पद्धतीचे हातवारे केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीने मारलेले सिक्सक तो बहुतेक विसरलेला दिसतोय. त्याची एकदा जिरवायला हवी अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.