अहमदाबाद | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मोहिमेची सुरुवात शानदार पद्धतीने केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा बाजा वाजवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियान या 2 विजयांसह वर्ल्ड कप जिंकण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने आतापर्यत या दोन्ही सामन्यांमध्ये बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियासमोर आता पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान आहे. टीम इंडिया शनिवारी 14 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे.हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी ओपनर बॅट्समन शुबमन गिल याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
शुबमन गिल याला डेंग्युमुळे वर्ल्ड कपमधील पहिल्या 2 सामन्यांना मुकावं लागलं. दोन्ही सामन्यात शुबमनच्या जागी ईशान किशन याला संधी देण्यात आली. शुबमनला डेंग्यु झाल्याने त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता शुबमनबाबत मोठी अपडेट आलीय.
टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी काही तासांआधी अहमदाबादमध्ये पोहचली. टीम इंडियासोबत शुबमन गिल हा देखील अहमदाबादला गेला आहे. शुबमनने या सामन्याआधी नेट्समध्ये जोरदार सराव केला. मीडिया रिपोर्टनुसार, शुबमनने तासभर कसून सराव केला. पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी शुबमनने जोरदार तयारीला लागलाय.
शुबमनचा जोरदार सराव
Shubman Gill has started the batting practice.
– Great news for Team India. pic.twitter.com/lkfcNgEi1F
— Johns. (@CricCrazyJohns) October 12, 2023
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.