India vs Pakistan | मंत्र फुकला आणि इमाम उल हक आऊट, हार्दिक पंड्या याने काय केलं?

| Updated on: Oct 14, 2023 | 3:42 PM

Hardik Pandya Take Imam Ul Haq Wicket | टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या याने टीम इंडियाला दुसरी विकेट मिळवून दिली. हार्दिकने विकेट घेण्याआधी केलेल्या कृतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

India vs Pakistan | मंत्र फुकला आणि इमाम उल हक आऊट, हार्दिक पंड्या याने काय केलं?
Follow us on

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. टीम इंडियाने या सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. पाकिस्तानच्या अब्दुल्लाह शफीक आणि इमाम उल हक या जोडीने सावध सुरुवात केली. या दोघांनी 41 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर मोहम्मद सिराज याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. सिराजने अब्दुल्लाह शफीक याला 20 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं.

अब्दुल्लाह शफीक आऊट झाल्यानंतर कॅप्टन बाबर आझम मैदानात आला. इमाम आणि बाबर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 32 धावा जोडल्या. ही जोडी बऱ्यापैकी जमली होती. टीम इंडियाकडून उपकर्णधार हार्दिक पंड्या 13 वी ओव्हर टाकायला आला. हार्दिक या ओव्हरमध्ये पाकिस्तानला दुसरा झटका देत पहिली विकेट मिळवली. हार्दिक 13 व्या ओव्हरमधील तिसरा बॉल टाकायला तयार झाला. हार्दिकने रनअप घेण्याआधी बॉल तोंडाजवळ घेऊन पुटपुटला आणि मंत्र मारला. त्यानंतर हार्दिकने बॉल टाकला आणि इमाम उल हक विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट झाला.

इमान 38 बॉलमध्ये 36 धावा करुन आऊट झाला. हार्दिकच्या या चमत्कारिक बॉलचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर एका बाजुला हार्दिकने विकेट मिळवण्यासाठी बॉलवर थुक लावल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. हार्दिकने विकेट मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोपही केला जात आहे.

हार्दिकचा जादुई बॉल

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.