अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात मोठा सामना आज शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येत आहे. वर्ल्ड कप 2023 मधील 12 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस उडवण्यात आला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात स्टार मॅचविनर बॅट्समनची एन्ट्री झाली आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये शुबमन गिल याची एन्ट्री झाली आहे. शुबमन गिल याला आजारपणामुळे ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्ध पहिल्या 2 सामन्यात खेळता आलं नव्हतं. मात्र आता आजारातून बरा झाल्यानंतर शुबमन गिल परतला आहे. शुबमन गिल हा निवडीसाठी 99 टक्के उपलब्ध असल्याचं कॅप्टन रोहित शर्मा याने सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितलं होतं. त्यानुसार शुबमन परतला आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे ईशान किशन याला बाहेर करण्यात आलं आहे. टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये हा एकमेव बदल आहे. तर पाकिस्तानने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत कोणताही बदल केलेला नाही.
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात आतापर्यंत एकूण 7 वेळा आमनासामना झाला आहे. टीम इंडियाच या 7 सामन्यात पाकिस्तानवर वरचढ राहिला आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये एकदाही टीम इंडिया विरुद्ध जिंकता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडिया हा सामना जिंकून पाकिस्तान विरुद्ध आठवा विजय नोंदवण्यासाठी तयार आहे.
शुबमन आला रे
Rohit Sharma flips the coin and India have elected to field first 🏏
Shubman Gill returns to the playing XI 👊#CWC23 | #INDvPAK 📝: https://t.co/1MHdUDB620 pic.twitter.com/iePPSRoORe
— ICC (@ICC) October 14, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.