नवी दिल्ली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील नवव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हशमतुल्लाह शाहिदी याच्याकडे अफगाणिस्तानचं कर्णधारपद आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कप मोहिमेतील सुरुवात विजयाने केली. तर अफगाणिस्तानला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानचा टीम इंडिया विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या विजयासाठी तयार आहे. हा सामना कधी होणार, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार हे सर्व आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना हा 11 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना राजधानी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर दीड वाजता टॉस होणार आहे.
टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेलवर पाहता येईल. तसेच डीडी नेटवर्कवर सामना फुकटात पाहायला मिळेल.
टीम इंडिया-अफगाणिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.