मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखण्याचं टीम इंडियासमोर आव्हान आहे. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं कठीण जाऊ शकतं. हायव्होल्टेज सामन्यात एक चूक चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे हाती असलेले डीआरएस रिव्ह्यू घेताना दोन्ही संघाचे खेळाडू काळजी घेत आहेत. पहिल्या डीआरएसमध्ये मोहम्मद रिझवानला फायदा झाला. त्यानंतर दुसऱ्या डीआरएसमध्ये रोहित शर्माला नशिबाची साथ मिळाली.
रोहित शर्मा याने पाकिस्तान चांगली खेळी करत 33 वं षटक कुलदीप यादव याच्याकडे सोपवलं. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा रोहित शर्मा होत्या. अपेक्षेप्रमाणे पहिला चेंडू कुलदीप यादव याने सउद शकील याला निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर फटका चुकला थेट पॅडवर आदळला. यामुळे जोरदार अपील करण्यात आली. पंचांच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. त्यामुळे आऊट की नॉट आऊट या संभ्रमात शेवटचे काही 4 सेकंद असताना रोहितने रिव्ह्यू घेतला.
What a review by Captain Rohit Sharma.
– A fantastic decision by Captain..!! pic.twitter.com/Hr2Xu54swg
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 14, 2023
रोहित शर्मा याने घेतलेला रिव्ह्यू वाया जातो की काय असा प्रश्न पडला होता. पण जेव्हा रिव्ह्यू पाहिला गेला. तेव्हा सउद शकील बाद असल्याचं स्पष्ट झालं आणि रोहित शर्माच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसला. सउद शकील अवघ्या 6 धावा करून बाद झाला. या विकेटनंतर पाकिस्तानवर दबाव वाढला आणि टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं.
Kuldeep yadav 🔥🔥
Good review by Rohit Sharma.#INDvsPAK pic.twitter.com/jgL0LhtIWN— ° (@imGurjar_) October 14, 2023
Kuldeep Yadav gets a wicket now! What a review by Rohit Sharma – Pakistan 4 down now.#INDvsPAK #indvspak2023 #abhiya #odi #WorldCup2023 #ODIWorldCup2023 pic.twitter.com/gk2fuOWGu2
— Virat Kohli(parody) (@harshraj5056) October 14, 2023
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघाने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे एकूण 4 गुण आहेत. त्यामुळे या सामन्यातील जय पराजयामुळे गुणतालिकेवर फरक दिसून येईल.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.