IND vs PAK : पाकिस्तानविरूद्ध मोठा विक्रम रचण्यापासून अर्शदीप एक पाऊल दूर, दिग्गजांच्या यादीत स्थान

| Updated on: Jun 09, 2024 | 4:33 PM

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याला अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे. भारत-पाक हायव्होल्टेज महामुकाबला संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे तयार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याच्याकडे तगडा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

1 / 4
मागील वर्ल्ड कपमध्ये अर्शदीप सिंह भारताचा प्रमुख वेगवान होता. कारण जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. अर्शदीपने त्यावेळी युवा असतानाही जबाबदारीने गोलंदाजी करत संघासाठी यशस्वी कामगिरी केली होती.

2 / 4
अर्शदीप सिंह याने पाकिस्तानविरूद्ध सहा विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तान संघाविरूद्ध टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये अर्शदीप सिंह आणि माजी खेळाडू इरफान पठाण एकाच स्थानावर आहेत. दोघांनीही सहा विकेट घेतल्या असून आजच्या सामन्यात एक विकेट घेताच अर्शदीप तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे.

3 / 4
पाकिस्तानविरूद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे  भारतीय गोलंदाज: हार्दिक पंड्या 12, भुवनेश्वर कुमार- 11 विकेट, इरफान पठान- 6 विकेट, अर्शदीप सिंह- 6 विकेट, आरपी सिंह- 4 विकेट

4 / 4
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (कीपर), संजू सॅमसन (कीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज